SMAK News Corner

CHECK OUT THE LATEST

SMAK News Gallery

For more details click on image.

CLICK ON EACH IMAGE FOR ENLARGED VIEW

On Friday 20.10.2023, the new office bearers of Smak paid a goodwill visit to the office of Dainik Lokmat. Editor of Dainik Lokmat Dr. Vasant Bhosle, Vice President Makarand Deshmukh, HRDevelopment Head Santosh Sakhre were present.

New office bearers of SMAK paid a goodwill visit to the office of Dainik Lokmat

CLICK ON EACH IMAGE FOR ENLARGED VIEW




Office Bearers Elect for the year 2023-24 Insertion

'स्मॅक' च्या अध्यक्षपदी ग्नॅट फाउंड्री चे सुरेन्द्र सोहनमल जैन, तर उपाध्यक्षपदी जयदीप एंटरप्राईजेस चे जयदीप जयसिंगराव चौगले यांची निवड करण्यात आली.

 

शिरोली एमआयडीसी : १० : शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असणाऱ्या 'स्मॅक'  या संस्थेच्या संचालक मंडळाची ५८ वी सभा मंगळवारी [ता. १०] रोजी एम. वाय. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली, या सभे मध्ये सन २०२३-२४ च्या नूतन कार्यकारणीची निवड झाली.

 

शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर ['स्मॅक'] च्या अध्यक्षपदी ग्नॅट फाउंड्री चे सुरेन्द्र सोहनमल जैन, तर उपाध्यक्षपदी जयदीप एंटरप्राईजेस चे जयदीप जयसिंगराव चौगले यांची निवड करण्यात आली.

 

ट्रेझरर पदी श्री शुभम टर्निंग सेंटर चे बदाम लक्ष्मण पाटील व ऑ. सेक्रेटरी पदी सोनाई इंजिनिअरिंग प्रा. लि., चे भरत परशुराम जाधव यांची निवड झाली. नुकत्याच पार पडलेल्या  

'स्मॅक' आयटीआय चेअरमनपदी उषा एंटरप्राईजेस चे प्रशांत शिवाजीराव शेळके यांची फेरनिवड करण्यात आली.

 

सॅण्ड रिक्लेमेशन प्लांट, शिरोली कोल्हापूर फौंड्री ॲण्ड इंजिनिअरिंग क्लस्टर च्या‌ चेअरमन पदी आर. एन. डी. इंडस्ट्रीज चे राजू तुकाराम पाटील यांची निवड करण्यात आली.

 

'स्मॅक' च्या २०२३-२८ साठी च्या पंच वार्षिक निवडणुकीत १३ पैकी १३ जागा बिनविरोध झाल्या. बिनविरोधासाठी तब्बल २५ वर्षाचा कालावधी लागला.

 

अध्यक्ष नूतन सुरेन्द्र जैन संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. एम. वाय. पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले. 

 

यावेळी 'स्मॅक' चे संचालक नीरज झंवर, अतुल पाटील, सचिन पाटील, सुरेश चौगुले, रणजित जाधव, शेखर कुसाळे आदी उपस्थित होते. नूतन कार्यकारिणीचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. जयदीप चौगले यांनी आभार मानले.

Fire station soon in Shiroli MIDC

There has been a demand for a fire station in Shiroli Industrial Estate for a long time. In case of an accident, this center will enable immediate fire control. Entrepreneurs will benefit from it.

Office Bearers Elect for the year 2022-23 Insertion

'स्मॅक' च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची फेर निवड

 

स्मॅक भवन शिरोली एमआयडीसी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन कोल्हापूर [स्मॅक] च्या अध्यक्षपदी दीपक पाटील, तर उपाध्यक्षपदी एम. वाय. पाटील यांची सर्वानुमते फेर निवड करण्यात आली. शिरोली औद्योगिक क्षेत्रातील उद्योजक व कामगारांच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत 'स्मॅक' या संस्थेच्या संचालक मंडळाची ४९ वी सभा शुक्रवारी अध्यक्ष दीपक पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी मावळते अध्यक्ष दीपक पाटील होते. यावेळी २०२२-२३ सालाकरिता`स्मॅक`च्या अध्यक्षपदी आर. ए. पी. इंडस्ट्रीजचे दीपक पाटील तर उपाध्यक्षपदी  रत्ना उद्योगचे एम. वाय. पाटील यांची फेर निवड करण्यात आली. तर ट्रेजरर पदी चौगले सिमेंट पाईप कं. चे जयदीप चौगले व ऑ. सेक्रेटरी पदी शगुन कास्टिंग्स प्रा. लि., चे शामसुंदर तोतला,`स्मॅक`आयटीआयच्या चेअरमनपदी आर.एन.डी इंडस्ट्रीज चे राजू पाटील व शिरोली सॅण्ड रेक्लेमेशन प्लांट चेअरमन पदी श्रीराम फाउंड्री ग्रुप चे निरज झंवर यांची सर्वानुमते फेर निवड निवड करण्यात आली.

 

संचालक मंडळाच्या आज झालेल्या बैठकीत या निवडी झाल्या. या निवडीनंतर नंतर सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात आले. दीपक पाटील यांनी आपल्या कारकिर्दीतील कामकाजाचा केलेला आढावा, `स्मॅक` चे काम आणि सर्व संचालक, स्वीकृत संचालक व निमंत्रित सदस्य यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. यावेळी नूतन अध्यक्ष दीपक पाटील यांनी भविष्यातील असोसिएशनच्या कामाविषयी मनोगत व्यक्त केले. दीपक पाटील यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याचा उल्लेख सर्वांनी केला व त्यांचे अभिनंदन केले.

 

'स्मॅक' ही पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी उद्योगांची शिखर संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत उद्योग क्षेत्राशी निगडित असलेले अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत. यावेळी स्किल ट्रेड प्रमोशन कमिटीचे चेअरमन अमर जाधव, कोल्हापूर फाउंड्री अँड इंजिनिअरिंग क्लस्टरचे चेअरमन सचिन पाटील, संचालक सुरेन्द्र जैन, अतुल पाटील, प्रशांत शेळके, जयदत्त जोशीलकर, भरत जाधव, स्वीकृत संचालक रवी डोली उपस्थित होते.

 

आभार एम. वाय. पाटील यांनी मानले.

About SMAK

SMAK, established in 1975, a dynamic association in Kolhapur, with the aim to solve the problems faced by the manufacturers.

Facilities on rent

Meeting Hall

Multipurpose Hall

Auditorium

Open Terrace Hall

Working hours

Tuesday to Sunday

09:30 am to 05:30 pm

Monday Holiday